Aaditi tatkare ladaki bahin महाराष्ट्रात महायुतीचं सरकार पुन्हा येण्याच्या आधीपासून चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महिला दिन म्हणजेच ८ मार्चच्या आधी ७ मार्चच्या संध्याकाळपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधीची रक्कम जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव
आदिती तटकरेंनी याबाबत पोस्ट करुन माहिती दिली आहे. पात्र महिलांसाठी आहे लाडकी बहीण योजना : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे.
लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव
आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण सात हफ्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप आठवा हाफ्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाही. तसंच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या निधीमध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला २१०० रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हाफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार? आणि २१०० रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.