Bus viral video सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
एक अपघात आपल्याबरोबरच दुसऱ्याचं आयुष्यदेखील संपवू शकतो, हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. यात कोणाचं नशीब चांगलं असेल तर तो वाचतो, नाहीतर असे भयंकर अपघात अनेकांचे जीवच घेतात. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात भयंकर अपघात होण्यापासून माणसाने स्वत:चा जीव वाचवला आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक माणूस आपल्या दिशेने रस्त्यावरून चालताना दिसतोय. तेवढ्यात अचानक मागून भरधाववेगात एक बस येते. व्हिडीओमध्ये असं दिसतंय की, बसवरील नियंत्रण सुटलंय आणि त्यामुळे बस त्या माणसाला धडक देते आणि तो माणूस खाली कोसळतो. खाली कोसळताच आपला जीव वाचवण्याचा तो प्रयत्न करतो. बसच्या टायरखाली येणार इतक्यात तो तिथून थोडा बाजूला होऊन स्वत:चा जीव वाचवतो.