Road Accident Video रस्ते अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यात काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होतात, तर काही अपघात हे दुसऱ्यांच्या चुकांमुळे होतात. खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या काही कमी नाही.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
आत्तापर्यंत खराब रस्त्यांमुळे अनेक चालक अपघाताचे बळी ठरले आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये असाच एक अपघात झाला, ज्यात खराब रस्त्यावरून एक बाईकस्वार जात असताना त्याचा तोल गेला आणि तो गाडीसह थेट खड्ड्यात पडला. या अपघाताच्या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तो पाहिल्यानंतर तुम्हालाही धडकी भरेल.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हायरल व्हिडीओ गुजरातमधील वडोदरा येथील एका परिसरातील आहे. येथे एका अरुंद रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खोदला आहे, त्यामुळे अनेक वाहने बाजूच्या रस्त्यावरून वाट काढून जातायत. यावेळी तिथून एक बाईकस्वार जात असतो, पण रस्त्यातील खड्डा चुकवून जात असताना त्याचा तोल जातो आणि तो थेट खोल खड्ड्यात पडतो. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी लगेच धाव घेत तरुणाला खड्ड्यातून सुखरुपपणे बाहेर काढलं. ही सर्व घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
वडोदरामधील या घटनेचा व्हिडीओ एक्स अकाउंट @SantoshGaharwar वरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर नेटकरी भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे. एका युजरने लिहिले की बिचारा वाचला, दुसऱ्याने लिहिले की, या घटनेसाठी संबंधित यंत्रणेवर कारवाई केली पाहिजे, कारण नेहमी गाड्या चालवणाऱ्या व्यक्तीची चूक काढली जाते.