FPJने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी (१ मार्च) घडली आणि मृत तरुणाचं वय २७ वर्षं असून, त्याचं नाव सचिन गरू, असं आहे, जो राजस्थानमधील राजसमंद येथील नगर परिषदेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होता. हॉटेलमध्ये बिल भरताना त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. रेस्टॉरंट कर्मचारी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर लोकांनी सचिनला जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @RohitMishra2024 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून ‘जेवल्यानंतर, एक तरुण हॉटेलचं बिल भरण्यासाठी काउंटरवर जातो आणि जेव्हा बिल पाहतो, तेव्हा २७ वर्षीय त्या तरुणाचा अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होतो. लोक अचानक मृत पावत आहेत याचे कारण काय आहे?’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
या व्हिडीओवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, हे “कोविडच्या वॅक्सिनमुळे होत आहे”. तर दुसऱ्यानं “आजकाल अनेकांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू होत आहे. सरकारनं यावर पावलं उचलली पाहिजेत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “कुणाचा शेवट कसा होईल सांगता येत नाही”